ही चिडचिड असह्य झोपेतल्या ग्लानीतही ओळखू यावेत स्पर्श आवाज आकार थांग हरवून बसलेला हा दृश्यांचा ढोबळ समुद्र डोळ्यांच्या झिलमिल पडद्यावर याला कितीदा तरंगत ठेवू ?
कबुल, शाबूत ठेवावा लागतो ढेर विश्वास संकल्पनेवरचा, माणसांवरचा, स्वतःवरचा सुद्धा, पण मला एकदा तरी अशी संहिता हवी आहे जिथे सरकलेला असेल केंद्रबिंदू फितरतीचा.
Advertisment
आहे का, आणखी एखादा दरवाजा ? जिवंत मोकाट वाऱ्यासाठी सताड उघडलेला !